Raj Thackeray
(राज ठाकरे)
Raj Thackery

टाटांना भुरळ पाडणारं नाशिकचं बॉटनिकलं गार्डन. नाशिक दिले, बघा आम्ही काय केले


नाशिक दिले ..... बघा डम्पिंग ग्राउंड चे आम्ही काय केले, हे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे


तूमच्या राजाला साथ द्या : मनसे गीत : श्री अवधूत गुप्ते


मुख्यमंत्री हे भाजपकुमार थापाडे, राज ठाकरेंचा घणाघात

नाशिकमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली. नाशिकमध्ये 4 ते 5 सभा घ्यायच्या होत्या. पण आजची ही एक सभा पुरेशी आहे. आजची सभा ही विजयाची सभा आहे असं म्हणत त्यांनी सभेला सुरुवात केली.
भाजप नेते केंद्रापासून ते राज्यापर्यंत नुसत्या थापा मारताय. खोट बोला पण रेटून बोला हे भाजपकडून शिकण्यासारखं आहे. असं सांगत त्यांनी “मी हे करेन, मी ते करेन” अशी मुख्यमंत्र्यांनी नक्कल काढत त्यांनी भाजपकुमार थापडे अशी उपाधीच देऊन टाकली.

विक्रोळीतील कन्नमवारमध्ये 'राजगर्जना'

मुंबईत दोन कोंबड्यांची झुंज; राज ठाकरेंनी डागली भाजप, शिवसेनेवर तोफ.

मुंबईतील विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये प्रचार सभा घेऊन राज ठाकरे यांनी मनसेच्या महापालिका निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. राज ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्याच सभेत भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या भांडणाचा मुंबईकरांच्या जगण्याशी काहीही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दोन कोंबडे झुंजत होते, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपवर तोफ डागली. यावेळी त्यांनी नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

१९५२ साली स्थापन झालेल्या भाजपला स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत. म्हणून ते पळवापळवी करतात,
मुंबईत भावी पिढीसाठी काही घडवायचे असेल तर, महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी मुंबईकर मतदारांना केले.
नाशिकमधील रस्त्यांवर एकही खड्डा सापडला नाही.
नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनचे काम पाहून उद्योगपती रतन टाटा यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली


कार्यकर्त्यांना विनंती नव्या जोमाने कामाला लागा
आता मनसेचे येणार म्हणजे येणार

जय मनसेतुमचे बहुमूल्य मत महाराष्ट्र नवनिर्माण सेने ला देवून, सर्व उमेदवारांना विजयी करा.मनसेला मत द्या, महाराष्ट्र आणि तुमच्या भावी पिढ्यांची जबाबदारी माझी राहिल : मा. श्री. राज ठाकरे
माझं सर्वांना एक आवाहन, यावेळची संधी वाया घालवू नका, मनसेला मदत करा : मा. श्री. राज ठाकरे
नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर अणूबॉम्ब पडूनही उभी राहिली, मात्र आमची शहरं अणूबॉम्ब पडल्यासारखी दिसत आहेत : मा. श्री. राज ठाकरे
पर्यटन या एका विषयावर मी महाराष्ट्रातील 10 ते 12 लाख तरुणांना रोजगार देऊ शकतो : मा. श्री. राज ठाकरे
मुंबईत इतक्या झोपड्या वाढायला जबाबदार कोण? : मा. श्री. राज ठाकरे
आम्ही आंदोलन केलं, तेव्हा महाराष्ट्रातील 44 टोल बंद झाले : मा. श्री. राज ठाकरे
आम्ही टोलविरोधात आंदोलन करत होतो, तेव्हा शिवसेना-भाजप कुठे होती : मा. श्री. राज ठाकरे
नेवल कोस्ट गार्डचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का हलवला, तुम्ही गुजरातचे की भारताचे पंतप्रधान: मा. श्री. राज ठाकरे
उद्योजकांनो मुंबईत गुंतवणूक का करता, गुजरातमध्ये या, हे महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन म्हणत आहेत : मा. श्री. राज ठाकरे
मोदींनी बुलेट ट्रेनची घोषणा केली, पण ही ट्रेन मुंबई- अहमदाबादच का? कोण मराठी माणूस अहमदाबादला जातो? : मा. श्री. राज ठाकरे


मा. श्री. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अध्यक्ष आहेत. भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला व जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे.

मा. राज ठाकरे यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर केलेल्या भाषणांनी अवघा महाराष्ट्र हलवून सोडला आहे. महाराष्ट्रावर प्रेम करणार्‍या प्रत्येक माणसाला त्यांनी आपल्या भाषणांतून एक नवा विश्वास दिला आहे, एक नवा रस्ता दाखवला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत परप्रांतीयांचे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना बाहेरचे येऊन जागा अडवत आहेत. काही राजकीय शक्ती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती महाराष्ट्रातून लोप पावताना दिसत आहे. मराठी माणसाला संधी न देता महाराष्ट्रात परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न जिथे जिथे सुरू आहेत तिथे आंदोलन करून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले आहे.

भाषावार प्रांतरचना होऊन मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ह्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले, हजारो जेलमध्ये गेले आणि मुंबईत १०६ हुतात्म्यांनी आहुती दिली. हे सगळं झालं आपल्या मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी. त्यानंतर महाराष्ट्र राज्यानेही स्वत:चा कायदा केला आणि सर्वत्र मराठी पाट्या असाव्यात असा आदेश दिला. ह्या कायद्याचे काटेकोर पालन व्हावे असा पक्षाचा कटाक्ष होता आणि आहे.

भाषा टिकली तर संस्कृती शिल्लक राहील. संस्कृती राहिली तर माणूस टिकेल. मराठी माणूस टिकवायचा तर भाषा जपावी लागेल. मराठी भाषा वैभवसंपन्न व्हायची तर महाराष्ट्रातल्या मुलांना ती भाषा शाळेपासूनच शिकवली गेली पाहिजे. शाळा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची मराठी भाषा शिकवायची नाही हे कसे चालेल? महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत-मग ती सरकारी असो, वा खाजगी, कुठल्याही माध्यमाची असो, शहरी असो किंवा ग्रामीण-मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे असा पक्षाचा आग्रह आहे.

आपण विजयी होऊच; कारण कोणताही कायदा, कोणतंही युद्ध, कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही. माझ्या मराठी माता-भगिनी-बांधवांनो, विजय तुमचाच आहे.

जय महाराष्ट्र!

“या मला आपल्याशी काही बोलायचे आहे,”

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


मनसेची लोकसभेची यादी

धन्यवाद! जय महाराष्ट्र!अँप विकासक : अमोल बापू दळवी